Malinagar east part flooded; The Nira river began to overflow
माळीनगर : गोपाळ लावंड
गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निरा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. माळशिरस तालुक्यातील कोल्हापूरी पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच माळीनगर तालुका माळशिरस येथील निरा नदी काठावरील घरांमध्ये रात्री नदीचे पाणी शिरले असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
मौजे गणेशगांव येथील कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला असून सोलापूर जिल्ह्यातील माळीनगर पूर्व भागातील गावांचा संपर्क तुटला आहेत.
गेल्या आठवडाभरापासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून कांदा, केळी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माळीनगर पूर्व भागातील खेडोपाड्यात ओढे नाले तुडूंब भरून वाहत आहेत. पावसाने जराही उसंत न दिल्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत.