Ration extension: सप्टेंबरच्या धान्याला मुदतवाढ द्या  Pudhari Photo
सोलापूर

Ration extension: सप्टेंबरच्या धान्याला मुदतवाढ द्या

रेशन दुकानदार संघटनेची जिल्हापुरवठा अधिकार्‍यांकडे मागणी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : अतिवृष्टीत सर्वसामान्याचा आधारवढ असलेल्या रेशन प्रणालीकडे लाभार्थीशी पावसामुळे पाठ फिरवली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या धान्यापासून अनेक लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. दुकानात मोठ्या प्राणात धान्य आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या धान्याला मुदत वाढ द्या, अन्यथा दुकानदारांना मोठा आर्थिक फटाक बसण्याची भिती रास्त भाव धान्य दुकानदार वा केरोसीन विक्रेता असोसिएशनच्या वतीने जिल्हापुुरवठा अधिकारी संतोष सरडे यांच्याकडे केली आहे.

राज्यामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टी मुळे बर्‍याच जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे.पिकांचे नुकसान झालेले आहे. शेकडो गावे बाधित झालेली आहेत. सोलापूर जिल्ह्यावर अतिवृष्टीचा संकट कोसळले आहे. गावे पाणी खाली गेली आहेत. अनेकांचे कुटुंब उघड्यावर पडल्याने त्यांना पुन्हा उभारी देण्याकरिता जागोजागी मदतीचा हात पुढे येत आहेत. त्यामुळे रेशन दुकानातील धान्याकडे लाभार्थ्यांनी पाठ फिरवली आहे.

सप्टेंबर महिन्याच्या धान्यापासून अनेक लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतिवृष्टी पावसामुळं हातावर पोट असलेल्या लाभार्थीना रेशन धान्य न मिळाल्यास आर्थिक भुर्दंडाला सामोरे जाव लागणार आहे. त्यामुुळे राज्याशासनाने अशा लाभार्थीसाठी ऑक्टोबर महिन्यात धान्य वाटपास मुदत वाढ द्यावी अशी मागणी केली आहे.

प्रशासनाकडे मुदतवाढीसोबतच पूरग्रस्तांसाठी प्रति कुटुंब पाच लिटर केरोसीन, 1 किलो साखर, 1 लिटर सोयाबीन तेलाची मागणी केली आहे. सकारात्मक शासन असल्यामुळे मागणी मान्य होण्याची शक्यता आहे.
- सुनील पेंटर, जिल्हाध्यक्ष, रास्त भाव धान्य दुकानदार वा केरोसीन विक्रेता असोसिएशन.
सोलापूर जिल्हा संघटनेने रास्त व नागरिकांच्या नितांत गरजेची मागणी केली आहे. त्याप्रमाणे संघटनेच्या वतीने निवेदनही प्राप्त झाले आहे. प्रशासनाकडे तत्काळ प्रस्ताव सादर केला आहे.
- संतोष सरडे, जिल्हा पुरवठा अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT