Pudhari
सोलापूर

Maha Shivratri: भक्तीचा मळा फुलला; अर्धनारी नटेश्वर मंदिरात महाशिवरात्री सोहळा

‘हर हर महादेव‌’च्या जयघोषाने आणि भक्तीमय वातावरणाने वेळापूर नगरी दुमदुमली

पुढारी वृत्तसेवा

वेळापूर : दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी हर हर महादेवच्या जयघोषाने आणि भक्तीमय वातावरणाने वेळापूर नगरी दुमदुमून गेली. महाशिवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावर येथील ऐतिहासिक श्री अर्धनारी नटेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन अत्यंत श्रद्धेने आणि मंगलमय वातावरणात करण्यात आले.

पुजारी रविराज गुरव यांच्या हस्ते परंपरेनुसार महापूजा आणि आरती संपन्न झाली. या विशेष दिनानिमित्त श्री अर्धनारी नटेश्वराच्या मूर्तीला अतिशय मोहक असा पारंपरिक पोशाख परिणधान करण्यात आला होता. मंदिराचा गाभारा आणि परिसर विविधरंगी फुलांच्या माळा, आकर्षक रांगोळी आणि नयनरम्य विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता.

महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी शिस्तबद्ध रांगा लावल्या होत्या. ही दर्शन रांग सांगोला रस्त्यावरील पुलापर्यंत पोहोचली होती. दिवसभरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनातर्फे खिचडी, थंड सरबत आणि केळीचे वाटप करण्यात आले.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गौरीहर गुरव, पुजारी रविराज गुरव, अभिराज होडगे, वैभव वाघे, ओंकार होडगे, ऋषी साठे, अविनाश खराडे, बाळू खंडागळे, करण उरणे, पार्थ करमळकर, मयूर गुरव, प्रणव गुरव, गणेश म्हेत्रे, विनोद रणवरे, अतुल गोडसे, पप्पू पिसे.,सोहम वाघे, अनिकेत शिंदे यांनी भाविकांना दर्शन सुलभ व्हावे. यासाठी परिश्रम घेतले. सपोनी आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT