सोलापूर

Madha Lok Sabha Election : माढ्यात पहिल्या फेरीत धैर्यशील मोहिते-पाटील ४५९८ मतांनी आघाडीवर

अनुराधा कोरवी

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते- पाटील हे पहिल्या फेरीत ४ हजार ५९८ मताने आघाडीवर आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज बुधवारी (दि. ४) रोजी सकाळी मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील यांना २४ हजार २४३ मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना १९ हजार ६४५ मते मिळाली. पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते- पाटील यांना ४ हजार ५९८ मध्ये मतांची आघाडी मिळाली आहे. विशेष म्हणजे, मोहिते- पाटील यांना माढा मतदारसंघात चार हजार ३४५ मते मिळाली आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT