Cheque Pudhari
सोलापूर

Madha cheque bounce case: धनादेश न वटल्यामुळे सहा महिने शिक्षा, 3.80 लाख दंड

खोटा धनादेश देत फिर्यादीची फसवणूक केल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमती पी.डी. चव्हाण यांनी एकास दोषी ठरवून सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली

पुढारी वृत्तसेवा

माढा : खोटा धनादेश देत फिर्यादीची फसवणूक केल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमती पी.डी. चव्हाण यांनी एकास दोषी ठरवून सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. याशिवाय 3 लाख 80 हजार 400 रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी शिक्षा ठोठावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विठ्ठल ऑटोमोटिव्ह सोलापूरचे सहायक व्यवस्थापक यासीन रजाक शेख यांना विठ्ठल ऑटोमोटिव्ह सोलापूर फर्मच्या येणे बाकी पोटी बसवराज महादेव लायने (रा. भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर) यांनी 1 लाख 90 हजार 200 रुपयांचा धनादेश दिला होता. परंतु, हा धनादेश बँकेत वटला नाही. धनादेश न वटल्याने धनादेशाचा अनादर झाला.

याबाबत फिर्यादी यासीन शेख यांनी आरोपीस वारंवार कळवून व कायदेशीर नोटीस पाठविली. मात्र तरी देखील बसवराज लायने याने नोटिसीला कुठल्याही प्रकारचे उत्तर दिले नाही. खोटा धनादेश दिला. याशािय रक्कम देखील परत केली नाही. म्हणून सर्व पुरावे पूरक असल्याचे ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.डी. चव्हाण यांनी बसवराज लायने यास दोषी ठरविले व त्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा व 3,80,400 रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी शिक्षा ठोठावली आहे. यामध्ये फिर्यादीतर्फे ॲड. मीरा कैलास प्रसाद व ॲड. श्रीकांत सफार यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT