ST Bus  Pudhari
सोलापूर

ST bus drivers: मद्यपान केलेल्या एसटीच्या चालकांवर मशिनद्वारे नजर

मध्यवर्ती बसस्थानकात होतेय चालकांची तपासणी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : कामावर हजर असताना मद्यपान करणाऱ्या चालकांवर आळा घालून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत परिवहन महामंडळाने (एसटी) कठोर पावले उचलली आहेत. त्यासाठी बसस्थानकातील आगारात कामावर हजर होणाऱ्या सर्वच चालकांची अल्कोटेस्ट मशिनद्वारे नियमितपणे तपासणी केली आहे. त्यामुळे चालक मद्यपान करुन कामावर आलाच तर त्याला तत्काळ पकडता येणार असून अपघातापासून प्रवाशांचा बचाव होणार आहे.

ऑनड्युटी मद्यपानामुळे होत असलेले संभाव्य धोके टाळण्यासाठी महामंडळाने कठोर निर्णय घेतला असून नवे नियमही लागू केले आहेत. याबाबत घेतलेला महत्वपूर्ण निर्णय हा महामंडळाने जाहीर केला आहे.

त्याच धर्तीवर या विभागातील नऊ आगारात कामावर हजर होत असणाऱ्या सर्वच बस चालकांची दररोज अल्कोटेस्ट मशिनद्वारे तपासणी करण्यात येत आहे. विविध मार्गावर धावणाऱ्या सर्वच चालकासह व वाहकांची देखील मद्यपान केले का याची तपासणी केली की नाही, हेही पाहिले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT