सोलापूर : जिल्ह्यात लम्पीचा प्रकोप वाढत आहे. आत्तापर्यंत दोन हजार जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. त्यातील एक हजार 467 जनावरे बरे झाली आहेत. तर 57 जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात लम्पीचा प्रार्दुभाव दररोज वाढत आहे. त्यामुळे ज्या जनावरांना लम्पीचे लसीकरण झाले नाहीत. अशा जनावरांना लम्पीचे लसीकरण करून घ्यावे. तसेच लम्पीची लागण झालेल्या जनावरांना इतर जनावरांपासून दूर व्यवस्था करावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसापासून लम्पी बाधित जनावरांची संख्या तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे पशुपालकांनी लम्पी आजाराची लक्षणे जनावरांना दिसताच पशुपालकांनी पशुवैद्यकीय अधिकारीही संर्पक साधून वेळीच उपचार केल्यास लम्पीचा आजार कमी होणार आहे, अन्यथा उपचार करण्यास उशीर झाल्यास जनावरे दगावण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे लम्पीचे लक्षणे दिसत वेळीच उपचार करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
जिल्ह्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र, जिल्ह्यातील 20 ते 30 टक्के जनावरांना अद्यापही लम्पीचे लसीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे लम्पीचा प्रकोप वाढत आहे. त्यामुळे लम्पीचे लसीकरण करण्यास पशुसंवर्धन विभागाकडून विलंब का होत आहे, असा सवाल पशुपालकांतून विचारला जात आहे.
लम्पी लागण जनावरे - 2000
बरे झालेली जनावरे - 1467
मृत्यू पावलेली जनावरे - 57
बाधित जनावरे - 441