सोलापूर : विधान परिषदेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून या निवडणुकीसाठी बॅलेट पेपरवर पसंती क्रमानुसार मतदान घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले.
यंदा विधान परिषदेसाठी सोलापूर जिल्ह्यातून 616 मतदार असून यात 49 मतदार हे स्वीकृत नगरसेवक आहेत. त्यांच्या मतदान अधिकाराबाबत निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हयातील प्रत्येक प्रांताधिकारी कार्यालयात सहा ठिकाणी मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी 25 मे ते 1 जून या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 ते 3 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया घेण्यात येणार आहे. निवडणूक लढू इच्छित असलेला उमेदवार हा राज्यातील कोणत्याही मतदार संघाचा मतदार असावा, परंतु त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार यादीतील मतदार सूचक आवश्यक आहे. निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे 68, महानगरपालिकेचे 111, नगर परिषदेचे 426 असे एकूण 616 मतदार असणार आहेत.
विशेष तपशील...
25 ते एक जून दरम्यान सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहे
दि. 25, 26, 27, 29, 30 आणि एक जून रोजी आज स्वीकारले जाणार असून बकरी ईदमुळे 28 जून रोजी अर्ज स्वीकारले जाणार नाही
सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत हे उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारले जातील
अर्जाची किंमत शंभर रुपये असेल
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी दहा हजार, एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारासाठी 5000 रुपये अनामात रक्कम