सोलापूर

Legislative Council Election: विधानपरिषदेच्या मतपत्रिकेवर पक्षाचे चिन्ह नसणार

मतदारांना लिहावा लागेल पसंती क्रमांक; मतपत्रिकेवर नोटाचा पर्याय नसणार

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी येत्या १८ मे रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत जिल्ह्यातील सहा मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्यासाठी ६१६ मतदार आहेत. यातील दत्तात्रय नडगिरी यांचा मयत झाल्याने या निवडणुकीत ६१५ जण प्रत्यक्ष मतदान करणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी एस.कार्तिकेयन दिली.

यंदाच्या विधान परिषद निवडणुकीत मत पत्रिकेवर पसंती क्रमांक देऊन आपले मतदान करता येणार आहे, मतपत्रिकेवर उमेदवारांचे मराठी आणि इंग्रजीत नाव, पक्षाचे नाव असणार आहे, परंतु पक्षाचे चिन्ह नसणार आहे. या निवडणुकीमध्ये नोटा हा पर्याय नसणार आहे, ही माहिती जिल्हाधिकारी कार्तिकीकेयन यांनी दिली. मतमोजणी २२ जून रोजी जिल्हा नियोजन भवन येथे सकाळी आठ वाजले पासून होणार आहे.

मतदानासाठी सहा केंद्र

सोलापूर जिल्ह्यात सहा मतदान केंद्रावर मतदान होणार असून यात कुर्डूवाडी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे ८० मतदार, उत्तर सोलापूर तहसील कार्यालय येथे १८८ मतदार, दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय येथे ८९ मतदार, पंढरपूर तहसील कार्यालय येथे १०० मतदार, मंगळवेढा तहसील कार्यालय येथे ६२ मतदार, अकलूज उपविभागीय कार्यालय येथे ९७ मतदार हे मतदान करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT