दहा हजार शाळेत नाही स्वच्छतागृह 
सोलापूर

School News : दहा हजार शाळेत नाही स्वच्छतागृह

धक्कादायक : मुला-मुलींच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

अमोल साळुंखे

सोलापूर : राज्‍यातील तीन हजार ५३७ शाळांमध्ये मुलींसाठी तर सहा हजार ३६९ शाळांमध्ये मुलांसाठी कार्यक्षम स्‍वच्‍छतागृह नसल्‍याची माहिती समोर आली असून, या शाळेत कार्यक्षम स्‍वच्‍छतागृह करण्यासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व स्वच्छ शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच शाळांमधील स्वच्छतागृहांच्या सुविधेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील अंदाजे दहा हजार शाळेत विद्यार्थ्यांमध्ये कार्यक्षम स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबरोबरच शिक्षणावरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः मुलींसाठी कार्यक्षम स्वच्छतागृह नसणे ही गंभीर बाब मानली जात असून, ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांमध्ये या समस्येची तीव्रता अधिक असल्याचे दिसून येत आहे. स्वच्छतागृहांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत असून, मुलींच्या शाळेतील उपस्थितीवरही त्याचा परिणाम होत असल्याची चिंता शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT