कुर्डूवाडीहून अक्कलकोटकडे जाणाऱ्या एसटीला कुंभारी टोलनाक्याच्या अलीकडे आग लागली. pudhari photo
सोलापूर

सोलापूर : कुंभारी टोलनाक्याजवळ धावती बस जळून खाक

MSRTC bus fire : चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : कुर्डूवाडीहून अक्कलकोटकडे जाणाऱ्या एसटीला कुंभारी टोलनाक्याच्या अलीकडे आग लागली. यावेळी बसमध्ये 45 ते 50 प्रवासी प्रवास करत होते. बस चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच बस थांबून प्रवाशांना सुचित करत सुखरूप बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टाळली. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याची प्राथमिक माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. यात बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. ही घटना सोमवारी (दि.14) सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेली माहिती अशी की, कुर्डुवाडीहुन सोलापूरला बस आली. सोलापूरहुन अक्कलकोट जाणारी एसटी (क्रमांक एम एच 20 बी एल 4215) ही कुंभारी टोलनाक्याजवळ पोहचली. अचानक इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी करत वाहक व प्रवाशांना सूचना केली. यावेळी बस मध्ये 45 ते 50 प्रवासी प्रवास करीत होते. चालकाने माहिती देता सर्व प्रवासी वेळीच आपले सामान घेऊन आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर पडले. पाहता पाहता बसमधून धुराचे लोट बाहेर पडू लागले व क्षणात आगिने उग्ररूप धारण केले.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल व पोलीस घटनास्थळी पोहोचले. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला असता आग वाढतच गेली. यात एसटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'पुढारी'शी बोलताना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT