Crime Pudhari
सोलापूर

Kondi casino bar raid: कोंडीतील कॅसिनो बारवर छापा; 11 महिलांसह 22 जणांवर गुन्हा

कोंडीतील कॅसिनो ऑर्केस्ट्रा बारवार सोलापूर तालुका पोलिसांनी छापा मारला

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : कोंडीतील कॅसिनो ऑर्केस्ट्रा बारवार सोलापूर तालुका पोलिसांनी छापा मारला. यामध्ये महिला तोकडे कपडे घालून बीभत्स नृत्य करीत अश्लील हावभाव करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी 11 महिलांसह 22 जणांवर गुन्हा दाखल केला.

कॅसिनो ऑर्केस्ट्रा बारमध्ये महिलांचे अश्लील नृत्य चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांनी मंगळवारी कॅसिनो ऑर्केस्ट्रा बार येथे छापा टाकला. यावेळी काही महिला बारमध्ये तोकडे कपडे घालून बिभत्सपणे अश्लील हावभाव करून संगीताच्या तालावर अश्लील नृत्य करीत होत्या. ग्राहकही अश्लील हावभाव करून संगीताच्या तालावर नाचत होते. पोलिसांनी बारमधील 11 महिला, 9 ग्राहक, बारचे मॅनेजर, चालक व मालक अशा 22 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी कॉन्स्टेबल भीमराव खंडागळे यांनी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तेथून साऊंड बॉक्स, रोख रक्कम, मोटार सायकल, मोबाइल हॅन्डसेट, असा एकूण पाच लाख 12 हजार 420 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल

बार मॅनेजर अमोल शिवाजी चव्हाण (रा. पत्रा तालीम), चालक रमेश अनिल इरकल (वय 30, रा. वडार गल्ली, बुधवार पेठ), मालक प्रभाकर केशव काळे, अक्षय विलास मस्के (वय 32, रा. शिवाजी नगर, बाळे), सोमेन शामल अधिकारी (वय 30, रा. शिवाजी नगर, बाळे), भगवान सौदार गोडसे (वय 44, रा. जुनी पोलिस लाईन), सौरभ शशिकांत आवताडे (वय 25, रा. चौपाड, दक्षिण कसबा), विजय बाळू कसबे (वय 38, रा. रेल्वे लाईन, कोनापुरे चाळ), ऋषिकेश सुभाष शिंदे (वय 34, रा. सिद्धेश्वर पेठ), अमोल काशिनाथ रजपूत (वय 34, रा. शिवाजी नगर, केगाव तांडा), विनोद बाबू पवार (वय 40, रा. तळेहिपरगा, ता. उत्तर सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT