सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर कोल्हापूरचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बदलीचे आदेश गुरुवार, दि. 2 एप्रिल रोजी सायंकाळी राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी काढले.
कुमार आशीर्वाद यांनी 23 जुलै 2023 रोजी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. पदभार घेतल्याच्या पहिल्याच दिवशी हत्तरसंग कुडल येथील संगमेश्वर मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची बैठक घेऊन मंदिराला भेट देत पाहणी करत बैठक घेतली. कार्तिकेयन हे 2020 बॅचचे भाप्रसे अधिकारी आहेत. याआधी त्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट, नांदेड येथे सेवा बजावली आहे. कार्तिकेयन हे सनदी लेखापाल आहेत.