Burglary Pudhari
सोलापूर

Solapur house burglary: जुळे सोलापुरात 16 लाखांची घरफोडी

सेवानिवृत्त सैनिकाचे घर फोडले, 21 तोळे सोन्यासह रक्कम लंपास

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील जुळे सोलापुरातील कल्याण नगर भाग दोन येथे माजी सैनिकाचे घर फोडून चोरट्यांनी 21 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 16 लाख 39 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घरफोडीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पहाणी केली.

माजी सैनिक चंद्रकांत शिवबाळा भांजे (वय 67, रा. कल्याण नगर भाग दोन, जुळे सोलापूर, सोलापूर ) हे कुटुंबियांसोबत बाहेरगावी गेले होते. मंगळवारी (दि. 26) ते घरी आल्यानंतर घरफोडी झाल्याचे तसेच 21 तोळे सोन्यासह एक लाख 20 हजार रुपये असा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. सहा. पोलिस आयुक्त दिलीप पवार, पोलिस निरीक्षक दादा गायकवाड यांच्याहस पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले.

श्वानपथकासही पाचारण करण्यात आले, परंतु घराच्या पुढे जावून श्वानपथक घुटमळले. या प्रकरणी विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वाढत्या घरफोडीमुळे नागरीकांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले आहे.

लोखंडी कपाटचे दार तोडले

चोरट्यांनी चंद्रकांत भांजे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरुममधील लोखंडी कपाटचे दार तोडले. त्यातील पाच तोळे सोन्याचे बिलवर, चार तोळे सोन्याच्या पाटल्या, चार तोळे सोन्याचे गंठण, एक तोळे सोन्याचे नेकलेस, अर्धा तोळ्याच्या दोन अंगठ्या, एक तोळ्याची एक अंगठी व सात ग्रॅमची एक अंगठी, तीन तोळे सोन्याचे कानातले, दिड तोळ्याचे सोन्याचे लॉकेट, अर्धा तोळे सोन्याची स्टोनची अंगठी असे एकूण 21 तोळे सात ग्रॅमचे सोन्याचे दागिने, रोख एक लाख 20 हजार रुपये लंपास केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT