Uday Samant Pudhari
सोलापूर

Uday Samant | आयटी पार्क शहरातच हवे : उद्योग मंत्री उदय सामंत

बहुचर्चित आयटी पार्क जागेबाबत सोलापुरात पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : बहुचर्चित आयटी पार्क जागेबाबत सोलापुरात पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली असून, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आयटी पार्क हे शहरातच हवे अशी भूमिका मांडत याबाबत येत्या दहा जुलै रोजी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे, अशी माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरसाठी आयटी पार्कची घोषणा केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सोलापूर शहराजवळ होटगी रोडवरील जलसंपदा जागेवर आयटी पार्क उभारण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. ही जागा जलसंपदा विभागाची असल्याने त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन ती महसूल प्रशासनाकडे वर्ग केली जाणार आहे, त्यानंतर ते आयटी पार्क उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या.

दरम्यान शुक्रवारी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोलापुरच्या दौऱ्यावर आयटी पार्क शहरातच हवे, अशी भूमिका मांडल्याने पुन्हा एकदा आयटी पार्क कुठे होणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT