बार्शी : एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रीसर्च बार्शी येथेे तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन बेंगलोरु येथील इसरो शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत वैष्णवी प्रभाकर पाटील यांच्या हस्ते झाले.
पाटील यांनी तंत्रज्ञान व संशोधन यामधील फरक स्पष्ट करून विद्यार्थ्यांना संशोधनात करिअर करण्याचे व बार्शी तालुक्यातून जास्तीत जास्त संशोधक तयार होतील यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक बार्शी तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी माननीय बालाजी नाटके यांनी केले प्रास्ताविकामध्ये बाल संशोधक तयार व्हावेत या दृष्टिकोनातून या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते असे सांगितले.
प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य लेंगरे बार्शी तालुका अध्यापक मंडळाचे अध्यक्ष बेंद्रे , बार्शी टेक्निकल चे मुख्याध्यापक विक्रम टकले केंद्रप्रमुख धनंजय जाधवर व वैष्णवी पाटील यांच्या आई वडील ही उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बार्शी नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी प्रत्येक घटनेचा कार्यकारणभाव समजावून घेऊन आपल्यामध्ये संशोधक वृत्ती निर्माण करावी अशा प्रकारचे मार्गदर्शन केले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन बार्शी तालुक्याचे समन्वय प्रताप दराडे आदींनी केले. या प्रदर्शनात एकूण 382 स्पर्धकांनी भाग घेतला.