Shaktipeeth Highway file photo
सोलापूर

Shaktipeeth highway: प्रस्तावित शक्तीपीठ मार्गावरील अकृषक जमीनीची होणार चौकशी

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन; येत्या पंधरा दिवसांत सुरु होणार प्रत्यक्ष मोजणी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : बहुप्रतिक्षित शक्तीपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातून जात असून, या मार्गावर मागील तीन महिन्यांत एनए (अकृषक) केलेल्या जमिनींची तपासणी होणार आहे. तसेच एनएन रद्द करुन यातील दोषींवर फौजदारी दाखल केली जाईल. यासाठी उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.

शक्तीपीठ महामार्ग होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आमिष दाखवून अनेकांनी जमिनी खरेदी करत त्या एनए करुन घेतल्या आहेत. जुने रेखांकन रद्द झाल्यानंतर नव्या महामार्गाच्या रेखांकन महामार्गावर असे व्यवहार झाल्याचा संशय असल्याने चौकशी केली जाणार असल्याचे कार्तिकेयन यांनी सांगितले.

येत्या पंधरा दिवसांत प्रत्यक्षात जमीन मोजणीला सुरुवात होणार आहे. त्याआधी मागील तीन महिन्यांत या प्रस्तावित मार्गावर ज्यांनी झाडे, फळ लागवड, घराचे बांधकाम, जागेचे एनए, नवीन विहिर खोदाई, बोअरवेल घेतले असल्यास त्याची सॅटेलाईट इमेज घेतले आहेत. ड्रोन सर्व्हेही सुरु आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पैसे भरल्यानंतर मोजणीची कामे 15 दिवसांत सुरु होणार असल्याचेही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले.

चेन्नई सुरत महामार्ग

चेन्नई सुरत एक्सप्रेस वे हा एक हजार 271 किलोमीटर लांबीचा असून, सहा पदरी ग्रीनफिल्ड प्रकल्प आहे. हा प्रकल्प भारतमाला परियोजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत विकसित केला जत आहे. हा मार्ग सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातून जात आहे. या महामार्गात अंतर्गत अक्कलकोट तालुक्यातील कामांचा शुभारंभ केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज गुरुवारी (दि. 14) होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT