Railway Recruitment Pudhari
सोलापूर

Railway Recruitment : रेल्वेमध्ये 'या' पदांची 'मेगाभरती', 18 हजार 799 पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

भरती बोर्डाकडून 18 हजार 799 पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू; 14 जून शेवटची तारीख

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : नोकरीच्या शोधातील व इयत्ता दहावी उत्तीर्ण आणि आयटीआयमधील ईलेक्ट्रीक व मेकॅनिकल ऑटोमोबाईलशी संबंधित प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी रेल्वे भरती बोर्डाकडून चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सहाय्यक लोको पायलट (एएलपी) या पदाच्या तब्बल 18 हजार 799 इतक्या रिक्त पदांवर मेगाभरती होतआहे. या पदासाठी इच्छुक तरूणांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया रेल्वे भरती बोर्डाने सुरू केली आहे.

इच्छुक व पात्र उमेदवार 14 जूनच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करू शकणार आहेत. दहावी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) मधील इलेक्ट्रीकशी संबंधित सहा आणि मेकॅनिकलसह ऑटोमोबाईल क्षेत्राशी निगडित ट्रेड पूर्ण केले असल्यास अशा तरूणांसाठी रेल्वेत सहाय्यक लोको पायलटची भरती प्रक्रिया ही रेल्वेच्या देशभरातील एकवीस विभागाकडून सुरू आहे. यामुळे, नोकरीच्या शोधातील इच्छुक उमेदवारांनी रेल्वे भर्ती मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करावा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 14 जूनच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत आहे.

  • पदाचे नाव : सहाय्यक लोको पायलट

  • एकूण पदे : 18,799

  • वेतन : 7 व्या वेतन आयोगानुसार स्तर-2 (18,000 रुपये ते 56 हजार 900 रुपये)

  • वयोमर्यादा : 18 ते 33 वर्षे (मागासवर्गीय तरुणांना शासकीय नियमांनुसार वयात सवलत)

  • शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय किंवा डिप्लोमा किंवा पदवी.

दोन टप्प्यात निवड प्रक्रिया

सहाय्यक लोको पायलट या पदांवरील भरतीसाठी निवड प्रक्रिया ही दोन टप्प्यांत पार पडेल. पहिल्या टप्प्यात संगणक आधारित परीक्षा (सीबीटी) असेल. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच दुसऱ्या टप्प्यासाठी बोर्डाकडून बोलावण्यात येईल. या दुसऱ्या टप्प्यातही संगणक आधारित परीक्षा (सीबीटी) असेल. मग, शेवटी शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीईटी) व वैद्यकीय चाचणीदेखील घेतली जाईल.

विविध ट्रेडमधील तरुणांना संधी

इलेक्ट्रिशियन, वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, आर्मेचर अँड कॉइल वाइंडर, रेडिओ आणि टीव्ही आदी इलेक्ट्रिशियनशी संबंधित तर फिटर, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक मोटर व्हेईकल, टर्नर, मशिनिस्ट ट्रॅक्टर मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक, हीट इंजिन, मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक आदी ट्रेड केलेल्या तरूणांना संधी आहे.

21 विभागातून भरती प्रक्रिया

अहमदाबाद, अजमेर, बंगळुरू, भोपाळ, बिलासपूर, चंदीगड, चेन्नई, गोरखपूर, गुवाहाटी, जम्मू श्रीनगर, कोलकत्ता, मालदा, मुंबई, मुजफ्फरपूर, पटना, प्रयागराज, रांची, सिकंदराबाद, सिलीगुडी आणि तिरुअनंतपूरम अशा 21 विभागातून ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT