सोलापूर : देशात दरवर्षी ५ लाख रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाची गरज भासते. पण, उपलब्ध अवयव व दात्यांची संख्या कमी असल्याने शेकडो रुग्ण प्रत्यारोपणासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा सुरू आहे. देशात केवळ किडनी सारख्या अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी ७३ हजार ६४६ हून अधिक रुग्ण प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील परिस्थिती सुद्धा चिंताजनकच आहे.
बदलती जीवनशैली व आहारातील भेसळ यामुळेच मानवी शरीरावर अनेक परिणाम होत असल्याचे जाणवते. कमी वयातही अनेक अवयव निकामी होणाऱ्या घटनेत दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच राज्यासह देशात सुद्धा निकामी होणारे अवयवांचीही संख्या अधिक असून त्यांची उपलब्धता यात मोठी तफावत आहे. अवयव प्रत्यारोपणासाठी शेकडो रूग्णांना प्रतिक्षा करावी लागते. अवयवदानाबाबत आजही समाजातील जनजागृती असून ती अद्याप दूर झाली नाही. बाधित रुग्णांना लागणाऱ्या अवयवांची संख्या ही मागणीच्या तुलनेत अत्यल्प आहे. ती १० टक्क्यांहून कमी रुग्णांनाच वेळेत अवयवांची प्रत्यारोपण करता येते.
अवयवदानाबाबत समाजात असलेली गैरसमज दूर करून त्याची व्यापक जनजागृती करणे गरजेची आहे. यातून दात्यांची संख्या वाढू शकते. याचा लाभ पर्यायाने प्रत्यारोपणाची प्रक्रिया करताना ती अधिक सुलभ व गतिमान होणार आहे. आजही महाराष्ट्रात किडनीसाठी ८,०२८ रुग्ण वेटिंगलिस्टवर आहेत. दात्यांची कमतरता तर आहेच याशिवाय प्रत्यारोपणासाठी आवश्यक वैद्यकीय पायाभूत सुविधांवरील मर्यादाही आहे. यामुळे मागणी आणि उपलब्धता यांच्यात तफावत निर्माण झाली.
अवयव न मिळाल्याने मृत्यूही
भारतात दरवर्षी सुमारे ४ ते ५ लाख रुग्णांना विविध अवयवांच्या प्रत्यारोपणाची गरज असते, परंतु, उपलब्ध अवयव आणि दात्यांच्या कमतरतेमुळे हजारो रुग्ण प्रतीक्षेत असतात. प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना वेळेत अवयव न मिळाल्याने त्यांचा यामुळे मृत्यूही होतो.
अवयवदानाची गरज
यकृत : २,२१८
हृदय : १२६
फुफ्फुस : ६६
स्वादुपिंड : ३२