India inflation rate 5.54 percent 
सोलापूर

India inflation rate|महागाईचा भडका, दर ५.५४ टक्क्यांवर! खर्चाचे गणित बिघडले, शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात महागाई अधिक

महागाईचा भडका, दर ५.५४ टक्क्यांवर! खर्चाचे गणित बिघडले, शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात महागाई अधिक

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : गौसपाक पटेल

देशात महागाईचा दर ५.५४ टक्क्यांवर विशेष पोहोचल्याने सर्वसामान्यांच्या खर्चाचे गणित बिघडले आहे. महाराष्ट्रात मात्र महागाईचा दर ५.१८ टक्के असल्याने राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत काहीसा दिलासा मिळाला आहे. देशातील ५० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या प्रमुख राज्यांमध्ये महाराष्ट्र १३ व्या क्रमांकावर आहे.

राज्यातील ग्रामीण आणि शहरी महागाईच्या दरात मोठी तफावत दिसून येत आहे. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात महागाई अधिक असल्याने गावाकडील कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे शहरात जीवन जगणे तुलनेने सोपे, तर ग्रामीण भागात ते अधिक कठीण झाल्याचे चित्र आहे.

सप्टेंबर २०२६ मधील ग्राहक मूल्य निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील ग्रामीण महागाईचा दर ६.१२ टक्के, तर शहरी महागाईचा दर ४.५६ टक्के नोंदवला गेला आहे. म्हणजेच ग्रामीण भागातील महागाई शहरांपेक्षा १.५६ टक्के-बिंदूंनी अधिक आहे. राष्ट्रीय पातळीवरही खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर ७.७४ टक्क्यांवर पोहोचला आहे. ग्रामीण भागात अन्नावरील खर्चाचा मोठा भार आणि वस्तूंच्या किमतीतील वाढ यामुळे कुटुंबांच्या दैनंदिन खर्चावर परिणाम होत आहे. महाराष्ट्राचा एकूण महागाई दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी असला, तरी ग्रामीण भागातील वाढता दर चिंतेचा विषय ठरत आहे.

राज्यांतील महागाईचे चित्र

तामिळनाडू ६.८१ टक्के, ओडिसा ६.७० टक्के, मध्य प्रदेश ६.६८ टक्के, तेलंगणा ६.६४ टक्के आणि आंध्र प्रदेश ६.२९ टक्के या राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षा अधिक महागाई नोंदवली गेली. उत्तर प्रदेशात ६.०८ टक्के, तर कर्नाटकात ५.८६ टक्के महागाई दर आहे. महाराष्ट्राचा ५.१८ टक्के दर या राज्यांच्या तुलनेत कमी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT