File Photo
सोलापूर

विवाह नोंदणीकडे जोडप्यांचा वाढतोय कल

2024 मध्ये 1,753 जणांची नोंदणी; शहरातून दररोज दहा जणांकडून प्रस्ताव

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : महानगरपालिका कार्यक्षेत्रात वर्षभरात 1753 जणांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र घेतले. व्हिसा अथवा इतर शासकीय फायदे मिळवण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. प्रमाणपत्रासाठी विवाह करणार्‍या जोडप्यांचा कल वाढला आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरातून दररोज दहा प्रस्ताव विवाह नोंदणीसाठी येत असल्याचे अधीक्षक संदीप कुरडे यांनी सांगितले.

2006 पासून सुप्रीम कोर्टाने विवाह प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. कोणत्या धर्माच्या जोडप्याने विशेष विवाह कायदा, 1954 आणि हिंदू विवाह कायदा, 1955 अंतर्गत त्यांच्या आपल्या विवाहची नोंदणी करणे बंधनकारक आहे. मुस्लिम, बौध्द, क्रिश्चन, रजिस्टर नोंदणी पध्दतीने विवाह या सर्वांसाठी विवाह नोंदणी बंधनकारक आहे. गेल्या पाच वर्षात नोंदणीबाबत जागृती झाली आहे. ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांना विलंब शुल्क भरून महापालिकेच्या डफरीन हॉस्पिटल मधिल विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी करता येते.

विवाह झाल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत नोंदणी केली तर 50 रुपये फी आहे. एक वर्षापर्यंत 100 रुपये आणि त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी 200 रुपये फी आकारली जाते. विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, विविध सरकारी कल्याणकारी योजना आणि कार्यक्रमांसाठी पात्रता मिळते, कोणत्याही कायदेशीर कामासाठी विवाह प्रमाणपत्र अनिवार्य आहे. अलीकडे सर्वच शासकीय कागदपत्रांसाठी विवाह प्रमाणपत्र गरजेचे झाल्याने विवाह प्रमाणपत्रासाठी गर्दी वाढत आहे.

दोन हजार लोकांची नोंदणी

विवाह नोंदणीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. त्यामुळे नवीन विवाह झालेल्या जोडप्यांचा विवाह प्रमाणपत्र काढण्याकडे कल वाढला आहे. सन 2023 मध्ये वर्षभरात फ्क्त 590 जोडप्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आज आखेर 1753 जाणांनी नोंदणी केली आहे.

ऑनलाईनचा जमाना असल्याने नोंदणी केल्यानंतर प्रमाणपत्र चार दिवसांच्या आत दिले जाते. भविष्यात कोणतेही संकट आले तर या प्रमाणपत्राच्या आधारे न्याय मागता येतो. विवाह नोंदणीकडे वधू-वरांचा कल दिसून येत आहे. दररोज दहा ते पंधरा प्रस्ताव येतात. तपासणी करूनच प्रमाणपत्राचे वितरण केले जाते.
- संदीप कु रडे, विवाह नोंदणी अधीक्षक महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT