Scholarship Pudhari
सोलापूर

Scholarship increase for backward class students: मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रक्कमेत वाढ करण्याच्या मागणीला अखेर यश आले आहे

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रक्कमेत वाढ करण्याच्या मागणीला अखेर यश आले आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून ही वाढीव रक्कम लागू होणार असल्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधानपरिषदेत केली. या निर्णयामुळे दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी या प्रश्नी पाठपुरावा केला होता. त्यांनी तत्कालीन राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांची भेट घेऊन मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या होत्या. महागाईमुळे शिक्षणाचा खर्च पेलणे कठीण होत असल्याने शिष्यवृत्तीत वाढ करण्याची मागणी त्यांनी केली होती. अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रामुख्याने सरकारच्या शिष्यवृत्तीवर अवलंबून आहे. शेतकरी आणि मजुरांच्या मुलांसाठी हा निर्णय संजीवनी ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT