सोलापूर : पतीच्या जाचाला कंटाळून महिलांनी जीवन संपवल्याच्या घटना सर्रास घडतात; परंतु पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे घडली. पोपट राजाराम जाधव (वय 33, रा. पिलीव, ता. माळशिरस) असे जीवन संपवलेल्या पतीचे नाव आहे.
पोपट जाधव याची पत्नी निकीता जाधव (22) हिचे अविनाश सुळे (25, रा. आष्टी, ता. मोहोळ) आणि अजित सुळे (30, रा. आष्टी, ता. मोहोळ) या दोघांसोबत विवाहबाह्य अनैतिक संबंध होते. या संबंधाची माहिती पोपट यास कळल्याने तो नैराश्येत होता. वारंवार सांगूनही निकीता हिने अनैतिक संबंध चालूच ठेवल्याने पोपट तिच्या त्रासला कंटाळला होता. शेवटी 27 नोव्हेंबर रोजी त्याने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले.
पोपट याचा भाऊ सागर राजाराम जाधव याने सोमवारी (दि.1) माळशिरस पोलिसांत तक्रार दिली. पत्नीसह तिच्या दोन प्रियकरांच्या त्रासाला कंटाळून पोपट याने आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार निकीता जाधव, अविनाश सुळे, अजित सुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील अविनाश आणि निकीता या दोघांना पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक गोसावी करीत आहेत.