Couple death: पतीने गळफास घेत जीवन संपवले तर पत्नीचा घरात मृत्यू Pudhari
सोलापूर

Couple death: पतीने गळफास घेत जीवन संपवले तर पत्नीचा घरात मृत्यू

कटफळ शिवारातील बंडगरवस्ती येथील घटना; परिसरात उडाली खळबळ

पुढारी वृत्तसेवा

महूद : सांगोला तालुक्यातील कटफळ शिवारातील बंडगरवस्ती येथे अज्ञात कारणाने पत्नी मयत झाली आहे. तर पतीने घराजवळच झाडाला अज्ञात कारणाने गळफास घेतल्याची घटना घडली आहे. अज्ञात कारणाने एकाच वेळेस पती-पत्नी मयत झाल्याची घटना गुरुवार, दि. 22 रोजी सकाळी उजेडात आल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत कटफळ येथील पोलिस पाटील बाळासाहेब मिसाळ यांनी सांगोला पोलिसात दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, त्यांचे थोरले बंधू श्रीमंत मारुती मिसाळ (वय 58) व त्यांची पत्नी मंडाबाई श्रीमंत मिसाळ (वय 54) हे दोघे पती-पत्नी कटफळ शिवारातील नायकुडेवस्ती येथे राहत होते. गुरुवारी सकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास त्यांना काशीलिंग बंडगर यांचा फोन आल्याने ते ताबडतोब बंडगरवस्ती येथील श्रीमंत मिसाळ यांच्या घराकडे गेले.

तेव्हा त्यांना त्यांची भावजय मंडाबाई मिसाळ या घरात झोपलेल्या अवस्थेत दिसल्या. जवळ जाऊन पाहिले असता त्यांचे नाकाला व आकाळावर काहीतरी लागल्याचे व त्यातून रक्त आल्याचे दिसले. त्यांची काहीच हालचाल होत नव्हती. त्या एका जागेवर निपचीत पडून होत्या.

तर भाऊ श्रीमंत मिसाळ यांचा शोध घेतला असता त्यांनी घरापासून सुमारे 500 मीटर अंतरावर असलेल्या शेवरीच्या झाडाला सुती दोरीने फाशी घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे भावजय मंडाबाई मिसाळ या कोणत्यातरी अज्ञात कारणाने राहते घरी मयत झाल्या आहेत.

तर भाऊ श्रीमंत मिसाळ यांनी घराचे जवळ अज्ञात कारणाने गळफासाने मयत झालेले आहेत. त्याबाबत पुढील योग्य ती कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक विनोद घुगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक भारत वाघे यांनी भेट देऊन पंचनामा केला. तसेच ठसे तज्ज्ञ आणि पोलिस यंत्रणेमार्फत घटनास्थळाची कसून तपासणी करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT