Accident News : कुरुल-कामती रस्त्यावर भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी file photo
सोलापूर

Accident News : कुरुल-कामती रस्त्यावर भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी

औढी येथून भाजीपाला घेऊन एक पिकअप वाहन सोलापूरच्या दिशेने जात असताना अपघात.

पुढारी वृत्तसेवा

Horrific Accident on Kurul-Kamati Road; Youth Dies on the Spot, One Seriously Injured

कामती : पुढारी वृत्तसेवा

मोहोळ तालुक्यातील कुरुल-कामती रस्त्यावर सोमवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. पिकअप वाहन आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

मृत तरुणाचे नाव चेतन तानाजी पवार (वय २७, रा. कामती बु.) असे आहे. तर अमोल कुमार भोसले (वय ३३) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही कामती बु. येथील रहिवासी आहेत.

माहितीनुसार, औढी येथून भाजीपाला घेऊन एक पिकअप वाहन सोलापूरच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी चेतन पवार आणि अमोल भोसले हे मोटारसायकलवरून कुरुलकडे जात होते. निकम यांच्या मंगल कार्यालयासमोर दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या धडकेत चेतन पवार यांना डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अमोल भोसले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच कामती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते माऊली निकम यांनी तत्परता दाखवत जखमी अमोल भोसले यांना स्वतःच्या वाहनातून उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT