मंगळवेढा : स्मशानभूमीची स्वच्छता ठेवण्यात कार्यरत आहेत. आज कर्ता माणूस घरात नसला की, स्वतःच्या घरात महिलांना भीती वाटते. पण एक महिला स्मशानभूमीत वास्तव्यास असणे, हे वाखाणण्याजोगे आहे. वारी परिवाराने स्मशानजोगी म्हणून काम करणार्या अनुराधा उप्पेवाड यांचा गौरव करून खर्या अर्थाने महिला दिन साजरा केला.
स्मशानभूमी म्हटल्यावर आपल्याला खूप भीती वाटते. तसेच अनेक रूढी, अंधश्रद्धा मनात निर्माण होतात. परंतु या सर्व गोष्टींना छेद देत समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आपले आयुष्य खर्च करणार्या अनुराधा उप्पेवाड या उच्चशिक्षित असूनही स्मशानभूमीत संसार थाटला. रात्री-अपरात्री केव्हाही स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी मानवी देह येतात. तरीदेखील न घाबरता तीसुद्धा एक प्रकारची मानवसेवा आहे, असे समजून आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे त्या उभ्या राहिल्या. यावेळी प्रकाश मुळीक यांनीही स्त्री शक्तीचा जागर घालीत उप्पेवाड कुटुंबाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे सांगत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सासरे सुभाष उप्पेवाड, पती शिवराज उप्पेवाड, गोरक्ष गायकवाड, विलासराव आवताडे, रामचंद्र दत्तू, बाळासाहेब जाधव, मदन पाटील, पांडुरंग नागणे, रविकिरण जाधव, रतिलाल दत्तू, चंद्रकांत चेळेकर, प्रफुल्ल सोमदळे, अजय आदाटे, स्वप्निल टेकाळे, सिध्देश्वर डोंगरे, विजय हजारे, अरुण गुंगे, सतीश दत्तू आदी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विनायक कलुबर्मे यांनी केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वारी परिवाराच्या वतीने स्मशानभूमीत पतीबरोबर आणि तितक्याच धाडसाने संसार करणार्या अनुराधा उप्पेवाड यांचा वारी परिवाराच्या वतीने साडी-चोळी, फेटा, सन्मानचिन्ह, मिठाई व पुस्तके देऊन कर्तृत्ववान व धाडसी महिला म्हणून सुवर्णा मुळीक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.