Government Meeting Food 
सोलापूर

Government Meeting Food: आरोग्यदायी मेन्यू दूध, फळे, अंडी अन् कडधान्ये

शासकीय बैठकीत तेलकट पदार्थ नाहीच; अधिकारी-कर्मचाऱ्यांना सात्विक अन्न

पुढारी वृत्तसेवा
आमसिद्ध व्हनकोरे

सोलापूर : सरकारने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे ठरवले असून, आता सरकारी बैठकांमध्ये पोषक आहाराला प्राधान्य देण्यात आले आहे. सरकारने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे ठरवले ले असून, आता सरकारी बैठकांमध्ये पोषक आहाराला प्राधान्य देण्यात आले आहे.

यानुसार बैठका, कार्यक्रम तसेच उपाहारगृहांमध्ये तेलकट पदार्थांवर बंदी घातली असून दूध, फळे, अंडी, उकडलेली कडधान्ये यांसारखा आहार बंधनकारक केला आहे. कार्यालयांच्या खानपान करारामध्ये आरोग्यदायी पदार्थच असायला हवेत, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

कार्यवाही करण्याच्या सूचना या निर्णयानुसार सरकारी आणि निमशासकीय संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली आणि पौष्टिक आहाराबाबत आवश्यक जनजागृती करावी. तसेच संतुलित आहार उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात.

आरोग्यदायी पदार्थ ठरविताना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर)- राष्ट्रीय पोषण संस्थेची (एनआयएन) मदत घेण्यास सांगण्यात आले आहे. पोषक आहाराची सवय ही शासकीय कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावी, या उद्देशाने सर्व विभागांना या निर्णयाची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत.

पौष्टिक पदार्थांचाही जेवणात समावेश

अल्पोगपाहारामध्ये तेलकट आणि अतिप्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे प्रमाण कमी करण्याबरोबरच पौष्टिक घटक असलेल्या स्थानिक आणि पारंपरिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. मंत्रालयातील उपाहारगृहात सध्या फळे, उकडलेली अंडी, उकडलेले कडधान्य, पोहे, इडली-सांबार, गरम दूध आणि ग्रीन टी यांसारखे आरोग्यदायी पदार्थ उपलब्ध करून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच डाळ, उसळ, पालेभाजी, ताक, कोशिंबीर, पुलाव यांसारख्या पौष्टिक पदार्थांचाही जेवणात समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आरोग्यदायी आहाराचे पर्याय

हंगामी फळे, केळी, सफरचंद, पेरू, पपई यांसारखी फळे, उकडलेली अंडी, उकडलेले कडधान्य, पोहे, इडली सांबार, मागणीनुसार गरम दूध, साखरविरहित ग्रीन टी, नाचणीची भाकरी, ज्वारी-बाजरीची भाकरी, ताक, कोशिंबीर, विविध भाज्या, डाळी आणि उसळी यांसारख्या पौष्टिक पदार्थांना प्राधान्य दिले जाणार आहे. संतुलित धान्यांचा समावेश करण्याची सूचना करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT