सोलापूर : वीरशैव लिंगायत धर्मात स्त्री-पुरूष भेदभाव न करता सर्वांना समानतेतून लिंगदिक्षा दिली जाते. मानव धर्माचा जयजकार करण्याचा संदेश देणारा लिंगायत धर्म आहे. भारतीय संस्कृतीत गुरु शिष्याच्या नात्याला अधिक स्थान आहे, गुरुंचे भक्त म्हणून जगा, असे आशिर्वचन काशीपीठाचे जगदगुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराध्यक्ष शिवाचार्य महास्वामी यांनी दिले.
शेगांव (ता.अक्कलकोट) येथील श्री जय हनुमान मंदिराचे कळसारोहण आणि श्री रेणुका यल्लामा देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कळसारोहण सोहळा रविवारी भक्तीमय वातावरणात झाला. यावेळी श्री काशीपीठ जगद्गुरुंचे गावातून अड्डपालखी महोत्सव पार पडले. त्यानंतर आयोजित धर्मसभेत महास्वामी आशिर्वचन देत होते.
व्यासपीठावर श्री.ष.ब्र.शिवयोगी शिवाचार्य महास्वामी (मंगरूळ), श्री.ष.ब्र.शंभूलिंग शिवाचार्य महास्वामी (आळगे), श्री.ष.ब्र. अभिनव राचोटेश्वर शिवाचार्य महास्वामी (तडलगी), मातोश्रीताई चिंचोळी, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, माजी जि.प.सदस्य मल्लिकार्जुन पाटील, अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती बाबूराव पाटील, प्रकाश पाटील, सुरेश गड्डी, सुरेश झळकी, श्रीमंत कोरे, अण्णाराव बिराजदार आदी उपस्थित होते. पहाटे कळसास महारुद्राभिषेक, बिल्वार्चन, नवग्रह, होम-हवन, पंचकलश पूजन झाल्यानंतर अड्डपालखी महोत्सवास प्रारंभ झाला. या महोत्सवात शेकडो महिला काशीपीाठाच्या ध्वजाचे प्रतिक असलेल्या पिवळा रंगाचे साडी नेसून डोक्यावर जलकुंभ घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. काशी जगदगुरुंसह उपस्थितीत शिवाचार्य यांच्याहस्ते कळसारोहण सोहळा पार पडला. दिवसभरात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सुत्रसंचालन श्री.प.पू.महांतेश हिरेमठ तद्देवाडी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविकांत शामराव बिराजदार, श्रीशैल हिप्पगी, लक्ष्मण कामाटी, महादेव चिक्कळी, निंगण्णा पाटील, सायबण्णा बिराजदार, शरणप्पा बिराजदार, देवराज बिराजदार, रविकांत चिक्कळी, मल्लिकार्जुन बिराजदार, पंचप्पा नेलूरे, प्रज्वल बिराजदार यांच्यासह आदी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.