Jaykumar Gore File Photo
सोलापूर

Jaykumar Gore : पालकमंत्र्यांनी घेतली झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्षांची शाळा

नागरिक, भाजप कार्यकर्त्यांची कामे करण्याचा दिला सल्ला

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर ः पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्यासह चार विषय समित्यांच्या सभापतींची बैठक घेऊन नागरिक आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांची कामे करण्याचा सल्ला दिला आहे.

पालकमंत्री गोरे हे सोमवारी (दि.6) सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापतींची बैठक घेऊन विकास कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषदेवर गेली चार वर्ष प्रशासक होते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक, भाजप कार्यकर्त्यांची अनेक कामे प्रलंबित राहिली आहेत. त्या कामांसह इतर सर्व विकासकामे तत्काळ मार्गी लावावे. तसेच प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यांना एक कोटी रुपयांचा निधी देण्याच्या सूचना अध्यक्ष वैद्य आणि उपाध्यक्ष पवार यांना दिल्या आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषदेवर भाजपाची सत्ता आहे. त्यांचे 38 सदस्य निवडून आले आहेत. तसेच शिंदे शिवसेनेचे आठ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अकरा असे एकूण सदस्य ही भाजपसोबत आहेत. त्या सदस्यांना ही निधी देण्याच्या सूचना पालकमंत्री गोरे यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT