Jaykumar Gore File Photo
सोलापूर

Jaykumar Gore : पालकमंत्री गोरे यांनी सोलापुरात ठोकला तळ

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी रणनीती आखत बालाजी सरोवर येथे झालेल्या बैठकीत उमेदवारांसह कार्यकर्त्यांना बळ दिले

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी रणनीती आखत बालाजी सरोवर येथे झालेल्या बैठकीत उमेदवारांसह कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतः पालकमंत्री सोलापुरात तळ ठोकून आहेत.

महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होताना दिसत आहे. भाजपमध्ये आयारामानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला. विद्यमान आमदारांनी माझा कार्यकर्ता म्हणजेच पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता, असे समीकरण या निवडणुकीत केले. त्यामुळे भाजप पक्षामध्ये नाराजी नाट्य सुरू झाले. त्यानंतर बंडोबांना थंड करुन नाराजी नाट्य कमी करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

यंदा भाजपने 75 प्लसचा नारा दिला आहे. त्यासाठी उमेदवारांनी प्रचारात मतदारांशी संवाद कसा साधावा, कुठल्या मुद्यांवर भर द्यावा यासह अन्य बाबींचे मार्गदर्शन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. यंदा भाजपची वाटचाल महापालिका निवडणुकीत मागील वेळेपेक्षा अधिक जास्त जागा मिळवण्याकडे सुरू झाली आहे. विरोधी पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांना भाजपने वेळीच सामावून घेतले नसते तर जनमानसात मोठा प्रभाव असलेले हे नेते भाजपविरोधी पक्षात जाऊ शकतात, याचा अंदाज घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार गोरे यांनी नेत्यांची नाराजी पत्करून विविध पक्षातून भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT