सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील जानेवारी, फेबु्रवारी महिन्यांत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निडणुकांचा कार्यक्रम या एप्रिल महिन्यात जाहीर होईल. संबंधित ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसंदर्भात काही न्यायालयीन अडचण नसल्यास या निवडणुका होतील, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. एप्रिलमध्ये पोटनिवडणुका होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात असलेल्या एकूण 1,140 पैकी 701 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्यामुळे प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. परंतु, प्रशासक नेमण्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंच निवडीसाठी आणलेली जनतेतून सरपंच ही पद्धत याही निवडणुकीत वापरली जाणार आहे. सरपंचपदासाठी आरक्षण सोडत निघाली असून, आता प्रभाग रचना, प्रभाग रचनेची आरक्षण निश्चिती, सुनावणी, त्यानंतर निवडणूक कार्यक्रम होणार आहे. तर, वेगवेगळ्या कारणास्तव अपात्र झालेल्या व निधन झालेल्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य पदाच्या पोटनिवडणुका घेण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे. या निवडणुकांसाठी आवश्यक असलेली प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. फेब्रुवारी अखेर पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम होणार आहे.
दरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदारांनी ग्रामपंचातीच्या निवडणुका कधी होतील असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी लवकरच निवडणुका घेण्यासाठी कुठली अडचण नाही असे पालकमंत्री गोरे यांनी सभागृहाला सांगितले होते.
मुदत संपणाऱ्या ग्रामंचायती
अक्कलकोट तालुक्यातील 73, बार्शीतील 15, करमाळ्यातील 51. माळ्यातील 82, माळसिरसमधील 43. मंगळवेजपातील 24, मोहोळमधील 72 पंढरपुरातील 72, सांगोल्यातील 61, उत्तर सोलापूरमधील 23 व दक्षिण सोलपूर तालुक्यातील 51 मुदत संपणाऱ्या ग्रामंचायतींच्या मुदत संपत आहे. फेबु्रवारी अखेर या ग्रामपंचायतींच्या मुदत संपत आहेत.