सोलापूर : सोने आणि चांदी दरवाढीचा रोजचा शिरस्ता थांबण्याचे नाव घेत नाही. रोज नवनवीन कारणांनी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती वाढत आहेत. शनिवारी अमेरिका - इराण या दोन देशातील तणावामुळे सोने प्रति तोळा आणि चांदीचे प्रती किलो दर प्रत्येकी दहा हजारांनी वाढले.
शुक्रवारी सोलापूरच्या सराफ कट्ट्यामध्ये सोन्याचा प्रतितोळा जीएसटीसह दर एक लाख 58 हजार होता तो शनिवारी एक लाख 68 हजार 700 वर पोहोचला. चांदीचा दर शुक्रवारी प्रतिकिलो दोन लाख 90 हजार रूपये होता तो शनिवारी थेट तीन लाखांवर पोहोचला.
अमेरिका इराण युद्ध आणि जागतिक अशांततेची परिस्थिती यामुळे सोने, चांदीचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यातच शेअर बाजाराचीही पडझड कारणीभूत आहे.- गिरीश देवरमनी, अध्यक्ष, सराफ असोसिएशन