सोलापूर : अमेरिकेच्या टॅरीफ वाढ मुुळे सोन्याच्या किमतीमध्ये विक्रमी वाढ चालू आहे. आंतरराष्टीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याशिवाय जागतिक सट्टेबाजाराला जोर चढल्याने सेोनेदरवाढीवर मोठा प्ररिणाम झाला आहे. एका वर्षात चांदीने 61 टक्के तर तर सोने 51 टक्के वाढ झाली आहे.प्रत्येक तासाला भाव वाढत असल्याने सराफ बाजारात मंदीचे वातावरण आहे. सोलापुरात सोने प्रति 10 ग्राम 1 लाख 26 हजार तर चांदी 1 लाख 75 हजार भाव आहे.
अमेरिकन टॅरिफ आणि जागतिक व्याापर युद्धाचा मोठा फटका सोने चांदी बाजाराला बसला आहे. सोलापुरात 24 कैरेट सोनेचा 10 ग्रॅम दर 1 लाख 26 हजार 410 आहे. तर चांदीचा चांदीचा दर (1 किलो) 1 लाख 75, हजार 970 इतका आहे. ऑक्टोबर मध्ये 15 दिवसापुुर्वी सोनेचा दर 1 लाखांच्या घरात होता. हजार 200 आणि सर्वात कमी 1 लाख 7 हजार 410 इतका होता. जून 2025 मध्ये 24 कैरेट सोनेचा दर 10 ग्रॅम सुमारे 97 हजार 343 होता. म्हणजेच काही महिन्यांतच सोलापुरात सोनेाच्या दरात 40 ते 50 हजारांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
चांदीनेही विक्रम मोडले
पुरवठा तुटवडा आणि वाढती औद्योगिक मागणी यामुळे ताण निर्माण झाल्याने भाव वाढ झाल्याचे सराफ व्यापारी सांगतात. सोलापुरातील दरवाढ अत्यंत जलद आहे. दर तासाला दर वाढ होत असल्याने भाव स्थिर नाहीत. सोलापुरात दर अधिक वाढतील की थांबतील, हे पूर्णपणे जागतिक दर व स्थानिक मागणी-पुरवठ्याच्या चक्रांवर अवलंबून असल्याने सराफ व्यापाऱ्यामध्ये चिंता आहे.
अमेरिकेचे निर्बंध त्यामुळे आतरराष्ट्रीय सोने बाजारात सट्टेबाजाराला मोठा वाव मिळाला आहे. त्यामुळे भाव होत आहे. दर वाढतील की थांबतील हे सांगता येत नाही यांचा मोठा परिणाम व्यापारावर झाला आहे. व्यापारामध्ये मंदी आहे. दिवाळी नंतर विवाह सोळ्याच्या निमित्ताने बाजारात तेजी येण्याची शक्यता आहे.- शिरीष देवरमनी अध्यक्ष सराफ व्यापारी असोसिएशन