सोलापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यांची मागणी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचे झालेले अवमूल्यन, भारताच्या खरेदीवर लावलेले कर, जगातील युध्दाचे परिणाम भारतातील सोन्याच्या बाजारपेठेवर झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून दरवाढ कायम आहे. गेल्या आठवड्यात 85 हजार प्रति तोळा असलेले सोने मंगळवारी बाजार उघडताच नव्वदी पार केले आहे.
मोठ्या प्रमाणात दरवाढ होऊनदेखील सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. सोन्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरने व्यवहार केले जातात. मात्र, त्यात भारतीय रुपयांची किंमत घसरली आहे. त्यामुळे देशात सोन्याने मोठी उसळी घेतली आहे. गेल्या आठवड्यात 85 हजार प्रति तोळा सोन्याचा भाव होता, त्यानंतर गुढी पाडव्याच्या दिवशी 89 हजार 40 रुपये प्रतितोळा भाव झाला आहे. सोमवारी रमजान ईदची सुट्टी असतानादेखील सोन्याने नव्वदी पार केली आहे. तरीदेखील बाजारपेठेमध्ये या दरवाढीचा कोणताच परिणाम दिसून आला नाही. मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये उलाढाल झाल्याची सराफ व्यापार्यांनी सांगितले. सध्या लग्नसराईचा हंगाम चालू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होताना दिसून येत आहे. सोन्यामध्ये सुुरक्षित गुंतवणूक मानली जाते. त्यामुुळे सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भाववाढ होऊन खरेदी झाली आहे. भाववाढीचा परिणाम बाजारपेठांमध्ये दिसला नाही, मात्र यंदा सणात ग्राहकांनी घट्ट सोने खरेदी करण्यापेक्षा तयार दागिने खरेदी करण्याकडे कल दिसल्याचे सराफ व्यापार्यांनी सांगितले.
सोन्याची दरवाढ कायम आहे. दरवाढीचा कोणताही परिणाम व्यापार्यांवर झाला नाही. गुढी पाडव्यादिवशी सोलापूरच्या सराफ बाजारात चांगली उलाढाल झाली. ही दरवाढ कायम राहणार आहे. त्यामुळे लाखांच्या पुढे जाण्याअगोदर ग्राहकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करावी.- हरिष करजगीकर, सराफ व्यापारी