Gas Shortage Pudhari
सोलापूर

Solapur gas shortage: गॅस तुटवडा; हॉटेल दर वाढले

एकही हॉटेल बंद न ठेवण्याचा असोसिएशनचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. सिलिंडरच्या दरातही 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत हॉटेल बंद ठेवायचे नाही, असा ठाम निर्णय हॉटेल असोसिएशनने घेतला आहे. पर्यायी इंधनांचा वापर करून व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, प्रत्येक बिलामागे इंधनाचा दहा टक्के दर लागू केले आहे. यामुळे ग्राहक संख्येत घट झाल्याची खंत हॉटेल असोसिएशनने व्यक्त केली आहे.

सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे केवळ सुमारे 50 टक्के वाटप होत आहे. हॉटेल व्यवसायाचे गणित कोलमडले आहे. या परिस्थितीत हॉटेल व्यावसायिकांनी इंडक्शन कुकर, इंडक्शन शेगडी, इलेक्ट्रिक शेगडी, कोळशाच्या भट्ट्या तसेच मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर सुरू केला आहे. विशेषतः जास्त गॅस लागणारे पदार्थ कमी करून किंवा तात्पुरते बंद ठेवून व्यवसाय चालू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही हॉटेलमध्ये पंजाबी व चायनीजसारखे जादा इंधन लागणारे पदार्थ कमी करण्यात आले असून साध्या व कमी इंधनात तयार होणाऱ्या पदार्थांना प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान, इंधनाचा खर्च वाढल्यामुळे मेनूच्या दरातही वाढ करावी लागली आहे.

इंधनाचा दर वाढल्याने अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कोणत्याही परिस्थितीत हॉटेल बंद राहणार नाही. इंधनाचे दर वाढल्याने नाईलाजाने खाद्य पदार्थांचे दहा टक्के दर वाढ करावी लागली आहे.
- संजीव इंदापुरे, अध्यक्ष, हॉटेल असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT