Gas Cylinder Blast 
सोलापूर

Solapur Gas Cylinder Blast : बोरामणीत गॅस सिलिंडरचा स्फोट; साहित्‍याचे नुकसान

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

पुढारी वृत्तसेवा

वळसंग : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी पंचायत समिती माजी उपसभापती प्रतिनिधी सोमनाथ पटणे यांच्या घरात मंगळवारी सकाळी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घरातील किचनमध्ये सिलिंडर गॅसची गळती होऊन अचानक स्फोट झाला. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व कुटुंबीय सुखरूप आहेत. घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी तत्काळ अग्निशामक दलाची गाडी पोहोचताच कर्मचाऱ्यांनी धाव घेत आग आटोक्यात आणली.

या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होती. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT