Gas cylinder explosion 
सोलापूर

Gas cylinder explosion: गॅसच्या टाकीचा स्फोट, काही क्षणात संसार उद्ध्वस्त

वैराग पोलिसांनी दाखवली माणुसकी

पुढारी वृत्तसेवा

वैराग : बार्शी तालुक्यातील लाडोळे येथील बाबूराव दगडू पवार यांच्या घराला विद्युत तारेच्या ठिणग्या उडून लागलेल्या आगीत गॅसच्या टाकीचा टाकीचा स्फोट झाला आणि काही क्षणातच संसार जळून खाक झाला. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र एक गुंठाही जमीन नसणाऱ्या ह्या शेतमजुराचे कुटुंब उघड्यावर आले. यामुळे हवालदिल झालेल्या कुटुंबाला पोलिसांकडून माणुसकीच्या भावनेतून मदत करण्यात आली.

आगीची घटना समजताच या कुटुंबाला वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली. तातडीने जीवनावश्यक वस्तूसाठी दहा हजार रुपये मदत दिली. शिवाय संसारोपयोगी साहित्य दिले. घाबरु नका हताश होऊ नका असं सांगून गावातील लोकांना मदतीची हाक दिली. यामुळे वैराग परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT