भोयरे : येथे पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचा पकडलेला गांजा. Pudhari Photo
सोलापूर

Drug trafficking case : गांजा प्रकरण; आरोपी झाले चार

तिघांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

बार्शी : कोट्यवधी रुपयांचा गांजा विक्री करण्याच्या हेतूने जवळ बाळगल्याप्रकरणी आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केल्याने भोयरे गांजा प्रकरणातील आरोपींची संख्या चारवर पोहोचली आहे.

दिग्विजय घोळवे (रा.सुभाष नगर बार्शी) असे अटक करण्यात आलेल्या चौथ्या आरोपीचे नाव आहे. उप सरपंच अंकुश दशरथ बांगर याला जागेवरच अटक करण्यात आली होती.तर शनिवारी बालाजी कदम व कृष्णा दुरगुडे (दोघे रा. तेरखेडा) या धाराशिव जिल्ह्यातील दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसाना यश आले होते. कदम, दुरगुडे व घोळवे या तिघांना बार्शी न्यायालयात उभे केले असता त्यांना शनिवार दि.30 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांनीही बार्शीला भेट देऊन गांजा प्रकरणाची माहिती घेतली होती.उर्वरित फरार आरोपींचा तातडीने शोध घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. बार्शी ते आगळगाव जाणार्‍या रस्त्यावर भोयरे शिवारात हा प्रकार समोर आला होता.अंकुश याला सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. शनिवारी बालाजी कदम व कृष्णा दुरगुडे दोघे (रा. तेरखेडा) या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसाना यश आले होते. ट्रकमधून गांडूळ खताची वाहतूक होत असल्याचा भास निर्माण करून गांडूळ खतासोबत गांजाच्या गोण्या भरून तो विक्री करण्याच्या उद्देशाने आणला होता. कंटेनरमधील हा गांजा आयशर टेम्पोत भरला जात होता.तालुका पोलिसांनी छापा टाकून एक कोटी 38 लाख 40 हजार रुपये किमतीचा गांजा व 25 लाख रुपये किमतीची तीन वाहने जप्त केली होती.

मुख्य सूत्रधाराचा शोध

गांजा वाहतूक विक्री या प्रकरणांमध्ये आणखी किती आरोपींचा समावेश आहे. याचा मुख्य सूत्रधार कोण आहे या व इतर बाबींचा तपास व्हावा याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे तपास सपोनी दिलीप ढेरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT