सोलापूर : जुगाराच्या नादातून सावकारांचे कर्ज झाल्याने 43 वर्षीय इसमाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. 28) सायंकाळच्या सुमारास घडली. जुबेर शेख (वय 43, रा. शास्त्रीनगर, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करून त्याने आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांनी सावकारांवर कारवाई करण्याची मागणी केली. जुबेर शेख याला जुगाराचा नाद लागला होता. त्यातून त्याला मोठे कर्ज झाले होते.
तो तणावामध्ये होता. शुक्रवारी दुपारी व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर त्याने विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी तलावाजवळ रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. माहिती मिळताच रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्याला सोलापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारापूर्वी तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर त्याचे पार्थीव शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आणले. जुबेर याने सावकाराच्या त्रासला कंटाळून आत्महत्या केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणा कुटुंबियांनी केली आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, बहिण असा परिवार आहे.
मला जुगाराचा नाद लागला त्यातून मी कर्जबाजारी झालो. यामुळे मी आत्महत्या करीत आहे. यामध्ये कुणाचा दोष नाही. कोणत्याही सावकारांचे नाव घेणार नाही. मला खूप तणाव आहे. सावकारांनी माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये, मी त्यांना खूप व्याज दिले आहे. दररोज व्याज देत होतो. आतापर्यंत खूप व्याज दिले. सावकारांनी दया करुन माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये. ज्यांच्याकडून हातउसने पैसे घेतल पैसे त्यांना लवकरच मिळतील. मी काही जणांना पैसे दिले ते लोक दोन-तीन महिन्यांत माझ्या आईकडे ते पैसे देतील. शेरु नामक व्यक्तीकडे तीस ते पस्तीस हजार रुपये दिले आहेत. तसेच महेबूब याच्याकडून 12 हजार रुपये येतील.