सोलापूर : अकरावी प्रवेशाची ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. गुरुवारी (दि. 5) नोंदणीचा शेवटचा दिवस आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. मात्र, अर्ज नोंदणी करताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांची नोंदणी अद्यापही बाकी आहे. त्यामुळे मुदतवाढ मिळावी, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.
गेल्या दहा दिवसांपासून अकरावी प्रवेशासाठी अर्जाची ऑनलाइन नोंदणी सुरु आहे. जिल्ह्यातील 40 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बाकीचे विद्यार्थी नोंदणी करत आहेत. परंतु नोंदणी करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने नोंदणी होत नसल्याची तक्रार विद्यार्थी, पालकांतून होत आहे. त्यामुळे प्रवेश नोंदणीसाठी आणखी काही दिवस मुदत मिळावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. नोंदणीची मुदत गुरुवारी संपत आहे. मुदतवाढ न मिळाल्यास अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना ऑफलाईन प्रवेश मिळावा, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.