Deepak aba Salunkhe Patil Pudhari
सोलापूर

Deepak aba Salunkhe Patil: दीपकआबा साळुंखे-पाटील भाजपच्या वाटेवर

लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होत आहे

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील भाजपाच्या वाटेवर असून, लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होत आहे.

सांगोला पंचायत समितीवर भाजपाच्या मदतीने सत्ता आणल्यानंतर ते भाजपात जाणार अशा चर्चेला उधाण येत आहे. मात्र, त्यांच्या प्रवेशाची तारीख निश्चित झाली नाही. परंतु ते निश्चित प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. 2024 मधील विधानसभा निवडणुकीत साळुंखे-पाटील यांनी उबाठा शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीत लढविली. त्यात त्यांचा पराभव झाल्यानंतर ते सध्या तटस्थ भूमिकेत असून, लवकरच भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान, सांगोला तालुक्यात शेकाप, शिंदे शिवसेना आणि माजी आ. साळुंखे-पाटील यांच्या गटाची मोठी ताकद आहे. साळुंखे-पाटील हे भाजपात प्रवेश केल्यास तेथे भाजपाची ताकद वाढणार आहे. त्यामुळे भाजपाकडून त्यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील मिळाला असून, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली साळुंखे-पाटील यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT