सोलापूर : विमानसेवेमुळेसोलापर शहरही हवाई क्षेत्राशी अन्य शहरांना जोडले जात असून, सोलापूर-मुंबई, सोलापूर-गोवा विमानसेवेनंतर आता बेळगांव, बंगळुरुसाठी विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय विमानसेवा कंपनीने घेतला आहे. रविवार, दि. 10 नोव्हेंबरपासून सोलापूर-मुंबई-बेळगाव या हवाई मार्गावर दररोज विमानसेवा मिळणार आहे.
तर येत्या 16 नोव्हेंबरपासून दर रविवारी बंगळुरूसाठीही विमानसेवा सुरु झाली असून, त्यासाठी तिकीट बुकिंग सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी बंगळुरूसाठी 13 हजार 150 रुपये मोजून एका प्रवाशाने तिकीट घेतल्याचे सांगण्यात आले.
सध्या सोलापूर-मुंबईची विमानसेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार अशी चार दिवस सुरु आहे. सोलापूर-मुंबई विमानसेवा ही आठवड्यातील सातही दिवस सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतू अजून मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध न झाल्याने प्रतिक्षेत आहे. येत्या काही दिवसांत स्लॉट उपलब्ध होईल, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
सोलापुरातून दुपारी 3 वाजता टेकऑफ झाल्यानंतर 4 वाजता मुंबईत विमान पोहोचेल. तेथून 4.30 वाजता टेकऑफ होऊन ते सायंकाळी 6 वाजता बेळगावमध्ये पोहोचेल. सलग 7 दिवस हेच वेळापत्रक राहील. दर रविवारी मात्र सायंकाळी 7.30 वाजता बंगळुरुत विमान पोहोचेल.