बार्शी : बार्शी शहरातील देशमुख प्लॉटमध्ये असलेल्या भंगारच्या गोडाऊनला विजेच्या तारा तुटून शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागून आगीत 12 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचा प्रकार आज पहाटे समोर आला. अमर गजघाटे (वय 35, रा. गाडेगाव रोड, बार्शी) यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते बार्शी शहर हद्दीतील साईराणानगर येथील भंगार खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात.
मंगळवार, दि. 14 ऑक्टोबर रोजी कामाकरिता सुट्टी असल्याने ते रात्रीच्या सुमारास स्क्रॅपचे कारखान्यावर सहज फेरफटका मारुन सर्व साहित्य व्यवस्थित आहे का, ते पाहून परत घरी गेले. घरी आल्यानंतर जेवण करुन रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास झोपी गेलो. त्यानंतर बुधवार, दि. 15 ऑक्टो. रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास स्क्रॅप कारखान्याचे शेजारी राहणारे मित्र विश्वेकर यांचा फोन आला की, कारखान्यावर लवकर ये, कारखान्याला आग लागली आहे, असे सांगितल्यानंतर लगेच घरातून कारखान्याकडे जाऊन पाहिले असता स्क्रॅपच्या कारखान्याला मोठी आग लागलेली दिसली. लगेच अग्निशामक दल बार्शी यांना फोन करुन बोलावून घेतले. अग्निशामक दलाच्या व शेजारील लोकांच्या मदतीने स्क्रॅपच्या कारखान्याला लागलेली आग विझविली. अधिक तपास हवालदार दत्तात्रय अडसुळ करत आहेत.