सोलापूर

Malshiras fire incident: माळशिरसमधील ऑटोमोबाईलच्या दुकानाला आग

माळशिरसमधील म्हसवड रोड येथील फ्रेंड्स ऑटोमोबाईलच्या दुकानाला आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले

पुढारी वृत्तसेवा

माळशिरस : माळशिरसमधील म्हसवड रोड येथील फ्रेंड्स ऑटोमोबाईलच्या दुकानाला आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. माळशिरस येथील शहानवाज शिकलगार यांचे फ्रेंड्स ऑटोमोबाईल या नावाचे दुचाकी दुरुस्ती आणि स्पेअर पार्ट विक्रीचे दुकान आहे.

रविवारी दुपारी दुकान बंद असताना 3 वाजण्याच्या दरम्यान अचानक दुकानातून धुराचे लोट यायला सुरुवात झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. परिसरातील लोकांनी दुकान मालकास याबाबत कल्पना दिली. त्यानंतर माळशिरस नगरपंचायतीच्या व सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. या घटनेची खबर मिळताच माळशिरस पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी तलाठी रोहन करकटे यांनी पाहणी करून अहवाल सादर केला आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेले नाही. शनिवार व रविवार दोन दिवस दुकान बंद होते. त्यामुळे दुचाकी गाड्यांचे लाखो रुपयांचे साहित्य जळाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT