Fake Will Case | दोन लाखांसाठी दिले बनावट मृत्युपत्र (File Photo)
सोलापूर

Fake Will Case | दोन लाखांसाठी दिले बनावट मृत्युपत्र

कामगार कल्याण खात्याकडून गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मृत्यूनंतर मिळणार्‍या पैशाच्या हव्यासापोटी चार महिला आणि एका नातेवाइकाने बांधकाम कामागाराच्या मृत्यूनंतर मृत्यू दाखल्यातील तारीख बदलली आणि बनावट मृत्यू दाखले दिले. त्यातील तिघांनी प्रत्येकी दोन लाख रुपये घेतले. ही बाब लक्षात आल्यानंतर कामगार कल्याण खात्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

शोभा काशिनाथ वाघमारे (रा. सोहाळे, ता. मोहोळ), मनोज रतनलाल अवस्थी (रा. मोदीखाना, सोलापूर), शैला सुरेश भांगे ( रा. लक्ष्मी गल्ली अक्कलकोट), सुनीता संजय कोळी (रा. मुकुंद नगर, सोलापूर) आणि वैशाली नागनाथ जेऊरे (रा. कामगार वसाहत भाग एक, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कामगार कल्याण कार्यालयातील दुकान निरीक्षक संतोषसिंग ज्ञानोबासिंग रजपूत (रा. अंबाजोगाई, जि. बीड, सध्या रा. सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

दोन लाख रुपये मिळावेत या हव्यासापोटी घरातील बांधकाम कामगाराच्या मृत्यू नंतर खर्‍या मृत्यू दाखल्यात फेरफार केला. मृत्यूची तारीख बदलून बनावट दाखला सादर केला. त्यातील काशिनाथ जयंत वाघमारे, वनमाला मनोज अवस्थी आणि सुरेश संगनप्पा भांगे यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे वाटपही करण्यात आले. यामुळे कामगार खात्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT