सोलापूर : सोशल मीडियावर सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या नावाने बनावट (फेक) अकाऊंट तयार करून नागरिकांकडे पैशांची मागणी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
काही अज्ञात व्यक्तींनी जिल्हाधिकाऱ्यांचे नाव व फोटो वापरून फेक अकाऊंट तयार केले असून, नागरिकांकडे पैशांची मागणी केली जात असल्याची माहिती प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे.