Manohar Mama 
सोलापूर

Manohar Mama: भोंदू मनोहरमामासह साथीदार ताब्यात

आर्थिक फसवणूकप्रकरणी करमाळा पोलिसांची पुण्यात कारवाई; यापूर्वीही गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : स्वत:ला संत बाळूमामांचा शिष्य म्हणवून घेणाऱ्या करमाळा तालुक्यातील भोंदू मनोहर भोसले ऊर्फ मनोहरमामा याच्यासह त्याच्या एका साथीदाराला फसवणुकीच्या गुन्ह्यात करमाळा पोलिसांनी पुण्यात ताब्यात घेतले. व्यवसायात प्रगती करण्यासाठी पूजा-अर्चा करतो असे सांगून 50 हजारांची फसवणूकप्रकरणी मनोहरमामासह त्याचा साथीदार विशाल वाघमारे (मांजरी, जि. पुणे) यांच्याविरोधात गौतम कसबे यांनी कुर्डूवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्याविरोधात आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी, व्यवसायात प्रगती करतो असे सांगून संशयित भोंदू मनोहर भोसले आणि विशाल वाघमारे यांनी गौतम कसबे याच्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. कसबे यांनी भोसले याला यातील 50 हजार रुपये दिले. मात्र व्यवसायात प्रगती झाली नाही. त्यामुळे ही फसवणूक असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली होती.

यापूर्वीही मनोहर भोसले याच्यावर महिला अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल आहे. सध्या राज्यात भोंदूगिरीच्या प्रकरणांत सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर भोंदू मनोहर भोसले याच्यावर झालेल्या कारवाईला महत्त्व आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT