सोलापूर : महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.राखी माने यांनी निराळे वस्तीतील मुळव्याधीवर उपचार करणारा बोगस डॉ. सी.के.मंडलला पोलिसाच्या ताब्यात देऊन 420 चा गुन्हा दाखल केला होता. मात्र डॉ. मंडल पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अखेर पळून गेला. घरी जाऊन कपडे घेऊन येतो असे म्हणून घरी गेला आणि हॉस्पिटला टाळे लावून फरार झाला.
निराळे वस्ती येथे मूळव्याधीवर उपचार करणार्या बोगस डॉक्टर सी. के. मंडलवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई केल्यानंतर शहरातील बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत. तीन पथकांच्या माध्यामतून शहरातील अशा डॉक्टारांची तपासणी चालू आहे. पात्रता नसताना बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करून फसवणूक केल्याने सी. के. मंडल, नीलिमा मंडल आणि देबाशिष दिलीपकुमार शर्मा (रा. उमा नगरी, सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
याप्रकरणी सचिन अलंकुटे (वय 50, रा. उत्तर सदर बोगस डॉक्टर सी. के. मंडल यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने पोलिसाच्या ताब्यात दिले होते. मात्र पोलिसांना कपडे घेऊन येतो म्हणून सांगितले. त्यामुुळे पोलिसांनी डॉ. मंडला नोटीस देऊन सोडून दिले, त्यानंतर डॉ. मंडल याने आपले हॉस्टिपल गाठले आणि तो तेथून पळून गेला आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी दिली.
एका उपचारासाठी 25 ते 30 हजार रुपये घेत असल्याचे उघड झाले आहे. मुळव्याध नसताना मुळव्याध झाल्याचे सांगत पैसे उकळल्याचे निदर्शनास आले आहे. मुळव्याधीवर उपचार करण्याची विचित्र पद्धत होती भगंदरला काळ्या दोर्याने गाठ मारत असे.
वैद्यकीय पदवी नसताना दवाखाना सुरू करून प्रशासन आणि नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार रॉय (वय 42, रा. एमआयडीसी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. रॉय यांच्याकडे शैक्षणिक पात्रता व नोंदणीकृत वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद कुमार यांनी फिर्याद दिली आहे.
शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टर आहेत. या डॉक्टारांची तपासणी चालू आहे बंगाली, तामिळ, कन्नड आणि तेलगू अशा मूळव्याधीवर उपचार करणारे शहरात दोनशे पेक्षा जास्त बोगस डॉक्टरांचे प्रमाण आहे. आता पर्यंत दोन डॉक्टारांवर गुुन्हे दाखल केले आहेत.- डॉ. राखी माने, आरोग्य अधिकारी, महानगर पालिका