दक्षिण सोलापूर : 1975 ते 1977 च्या आणीबाणीच्या दरम्यान जेल झालेल्यांना शासनाने वाढीव मानधन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने मानधनासाठी 25 सप्टेंबर पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एक महिन्यापेक्षा जास्त करावास झालेल्यांना दर महा 20 हजार रुपये मानधन आणि जर त्यांचे निधन झाल्यास त्याच्या पत्नीस 10 हजार तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास झालेल्यांना 10 हजार रुपये मानधन आहे. जर त्यांचे निधन झाल्यास त्याच्या पत्नीस 10 हजार मानधन देण्यात येणार आहे. 18 जुलै 2022 च्या नवीन शासन निर्णयानुसार सदर योजना नव्याने सुरू करण्यात आली आहे.
त्यानुसार, आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती दि.2 जानेवारी 2018 पुर्वी हयात नसल्यास त्याच्या पश्चात हयात पती अथवा पत्नी अशा व्यक्तींनी दि.15 सप्टेंबर 2018 रोजीच्या शासन पुरक पत्रासोबतच्या परिशिष्ट ब मधील शपथपत्र अर्जासोबत जोडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावे. कोणत्याही परिस्थितीत दि.25जुलै नंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तरी विहित वेळेत लाभार्थ्यांनी आपले अर्ज सादर करावेत असे आवाहन दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी केले आहे.
अर्ज दाखल करण्याचा अंतिम तारीख हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनाकांपासून 90 दिवसापर्यंत राहील. कोणत्याही परिस्थितीत दि.25 सप्टेंबर 2025 नंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तरी विहित वेळेत लाभार्थ्यांनी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन दक्षिण तहसीलचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी केले आहे.