Ayushman Bharat Card Pudhari
सोलापूर

Ayushman Card: आयुष्मान कार्डसाठी करावी लागणार ई-केवायसी

सोलापूर जिल्ह्यातील 62 टक्के लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्डचे ई-केवायसीच नाहीच

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : गरीब व सामान्य लोकांना त्यांच्या आरोग्यावरील विविध आजारांवर मोफत व कॅशलेस पध्दतीने उपचाराची सोय आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत आहे. ही योजना केंद्र व राज्य सरकार कडून राबवण्यात येते. या योजनेचा लाभ हा समाजातील प्रत्येक कुटुंबासह प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासन आयुष्मान कार्डसाठी मोहीम हाती घेतली आहे.

जिल्ह्यातील 40 लाख कार्डधारक लाभार्थीपैकी 62 टक्के लाभार्थ्यांचे ई-केवायसी करायचे अजून तसेच राहिले असून ते शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गावनिहाय व शहरी भागात वॉर्डनिहाय विशेष मोहीम उघडले आहे.

गत 27 एप्रिलपर्यंत प्रशासनाकडील उपलब्ध आकडेवारीनुसार जिल्ह्यात 15 लाख 44 हजार (38 टक्के) इतक्याच लाभार्थ्यांचे ई-केवायसी करण्यात आले आहेत. विविध आजारावरील मोफत उपचारासाठी आयुष्मान कार्ड असणे गरजेची आहे. ऐनवेळेला या कार्डचे ई-केवायसी करण्यासाठी धावपळ करण्यापेक्षा अगोदरच ई-केवायसी केल्यास शहर जिल्ह्यातील या योजनेच्या पॅनल वरील कोणत्याही रुग्णालयात मोफत उपचार घेता येऊ शकते. याकरिताच आयुष्मान कार्डचे ई-केवायसी करणे अनिवार्य राहणार आहे. ती राज्य शासनाकडून मोफत केली जात आहेत.

ई-केवायसी करणे अनिवार्य

मोफत उपचारासाठी आवश्यक असलेले आयुष्मान भारत या आरोग्य कार्डचे नूतनीकरण या कार्डधारकांना आपल्या घरात बसूनसुध्दा करता येते. ई-केवायसी नॅशनल हेल्थ अथॉरिटीने आयुष्मान ॲप मोबाईलमध्ये विकसित केली आहे. लाभार्थ्याला आधार ओटीपी किवा चेहरा ओळख पद्धतीने ई-केवायसी करता येते. याद्वारे आपले आयुष्मान कार्ड हे मोफत उपचारासाठी वापर करू शकतो. या योजनेद्वारे प्रति कुटुंबाला प्रतिवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार देशातील कोणत्याही पॅनल वरील शासकीय किवा खासगी रुग्णालयांत उपचार घेता येते. म्हणून प्रत्येकाने आपले ई-केवायसी करणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT